logo

ग्रामस्थांच्या एकीनेच महावितरण झुकले, घटनेचे केले राजकारण : निकिता नारायण गायकवाड.

तळा  : शेणवली मध्ये काल दिनांक १९ रोजी सकाळी १० च्या सुमारास शेतात पडलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून हृतिक यशवंत हिलम याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण गावावर शोककळा पसरली. घडलेल्या प्रकरणाला पूर्ण पणे महावितरण दोषी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी एकमुखी केला आणि ग्रामस्थानीच हृतिकच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्या असा आग्रह महावितरण कंपनीला केला, जो पर्यंत नुकसान भरपाईचे लेखी पत्र मिळत नाही तोवर आम्ही मृतदेह घरी नेणार नाही असे सर्व ग्रामस्थांनी ठामपणे महावितरण कंपनीला बजावून सांगितले. फक्त ग्रामस्थांच्या असलेल्या एकजुटीमुळेच हृतिकला न्याय मिळाला असल्याचं आमच्याशी बोलताना ग्रामस्थांनी सांगितलं.

कालची घटना अत्यंत दुर्दैवी असून असे दुःख कोणाच्याच वाट्याला येऊ नये. मात्र अश्या दुर्दवी घटनेत देखील शेतकरी कामगार पक्षाची काही मंडळी पक्षवाढीचे काम करतात हे अत्यंत लाजिरवाणे आहे. निदान अश्या बाबतीत तरी राजकारण आणू नये. : निकिता नारायण गायकवाड. (सरपंच,शेणावली ग्रामपंचायत)

आज मी जवळपास तीस ते पस्तीस वर्ष राजकारण आणि समाजकारण करतोय. पण अश्या दुर्दैवी घटनेत कधीच मी आणि माझ्या पक्षाने राजकारण केलं नाही आणि करणार पण नाही. हि वेळ श्रेय घेण्याची नाही, पक्षवाढीसाठी अश्या बाबतीत शेतकरी कामगार पक्षाने श्रेय घेणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. : खेळू दामू वाझे (तालुका अध्येक्ष काँग्रेस)

1
17356 views
  
32 shares